Ad will apear here
Next
विश्व मराठी संमेलनानिमित्त सात निःशुल्क लेखन (ऑनलाइन) कार्यशाळा
विश्व मराठी परिषदेने २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये विश्व मराठी ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा ऑनलाइन लाइव्ह पद्धतीने १० ते १६ डिसेंबर यादरम्यान होणार आहेत. यामध्ये भारताबाहेरील ३५ देशांतील, अमेरिकेतील ५० राज्यांतील आणि भारतातील महाराष्ट्रासह २५ राज्यांतील मराठी भाषकांना सहभागी होता येणार आहे. 

या कार्यशाळांचे विषय आणि तारखा अशा आहेत –

१० डिसेंबर २०२० - यशस्वी लेखक - कॉपीराइट, आयएसबीएन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इत्यादी

११ डिसेंबर  - कादंबरी लेखन

१२ डिसेंबर - संशोधन पद्धती व उपयोजन

१३ डिसेंबर - अनुवाद कसा करावा

१४ डिसेंबर - ब्लॉग लेखन

१५ डिसेंबर – कथालेखन

१६ डिसेंबर - कवितालेखन

या कार्यशाळांमध्ये ज्येष्ठ लेखक भारत सासणे, अनुवादक लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी यांच्यासह नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, संपादिका मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. रेखा इनामदार-साने, अंजली कुलकर्णी, राजन लाखे, अॅड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळा १० ते १६ डिसेंबर २०२० यादरम्यान भारतीय वेळेनुसार रोज सकाळी नऊ वाजता सुरू होतील. कार्यशाळा निःशुल्क असल्या, तरी खाली दिलेल्या लिंकवर पूर्वनोंदणी आवश्यक आहे. 

‘संमेलनानिमित्ताने नि:शुल्क ऑनलाइन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित लेखकांनी घ्यावा,’ असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

नोंदणीसाठी लिंक : www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani

अधिक माहितीसाठी संपर्क : दैदीप्य जोशी – ९०२१७ ३२३३७ 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DVRFCT
Similar Posts
कोविड-१९ : विश्व मराठी परिषदेतर्फे कथा, कविता लेखन स्पर्धा; रोख बक्षिसे पुणे : करोना या विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-१९ या अभूतपूर्व महामारीमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीशी दोन हात करता करता अनेक हात हे अनुभव कथा-कवितेच्या रूपाने शब्दबद्धही करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने जगभरातील मराठी भाषकांसाठी कथा-कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे
वैश्विक मराठी भाषकांचे पहिले ऑनलाइन संमेलन जानेवारीत विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. त्या संमेलनाची माहिती देणारा हा लेख...
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language